Thursday, May 31, 2012

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०५.२०१२)

परमपूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०५.२०१२)

खराखुरा एकमेव सद्‍गुरु आहे तो ओळखायचा कसा? ...तो जोपर्यंत स्वत:ला कर्माच्या अटळ सिध्दांताशी बांधून घेत नाही तोपर्यंत मानवाला त्याच्याशी बांधून घेता येत नाही.

जे डोळस असून त्याला समोर असूनही बघू शकत नाहीत ते खरे आंधळे. ज्या डोळ्यात गुरुची image नाही तो मांसाचा गोळाच आहे. गुरुकडे बघणे ही देखील एक सेवाच आहे, त्याच्याकडे बघता बघता प्रेम दाटून आले की त्याचे गुण आपोआप आठवू लागतात.

तो एकदा का अवतरीत झाला की त्याच्या अस्तित्वामुळे अख्खी पृथ्वीच गुरुक्षेत्रम्‌ होते. तुम्ही मग जगाच्या पाठीवर कुठेही असा तुम्ही त्याचे नाव घेत असाल तर तुम्ही गुरुक्षेत्रम्‌मध्येच असता.

गुरुक्षेत्रम्‌ म्हणजे काय? तुमची त्याच्याकडे पाहणारी एकमेव दृष्टी. तुम्ही त्याच्याकडे पाहणे हेच तुम्हांला सर्व समर्थं सर्वार्थसमर्थं बनवते.
Read more on ....
http://www.manasamarthyadata.com/thursday_excerpts.php?id=41&lang=4


Manasamarthyadata Counter on Android Market

For all those who have not downloaded the Manasamarthyadata Counter from Android market, below is the link to download the same !!!
https://play.google.com/store/apps/details?id=com.Android.Count&feature=search_result#?t=W251bGwsMSwxLDEsImNvbS5BbmRyb2lkLkNvdW50Il0
 
 

Hanuman Chalisa Pathan - 2012

by Samirsinh Dattopadhye on Tuesday 29th May, 2012

I had in one of my last few posts announced about the pathan of Hanuman Chalisa at Shree Aniruddha Gurukshetram which was held between 17th May to 23rd May 2012. During this particular activity, a total of 862 devotees had participated and a total of 51,925 avartans were performed. The exact details of the pathan are mentioned in the below given chart.

पूज्य समीरदादांचे श्रद्धावानांना महत्वाचे मार्गदर्शन

पूज्य समीरदादांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (१५-११-२०११) श्रद्धावानांना अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले  -

१) गुरुवारच्या प्रवचन स्थळी दंडवत व दत्तयंत्र मस्तकास लावुन घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
दत्तयंत्राचे महत्त्व सांगताना पूज्य समीरदादांनी सांगितले की, मांढर देवीच्या सेवेच्या वेळी ५ दत्तयंत्र व दत्तात्रेयांचे फोटो प.पू.बापूंनी कार्यकर्त्यांकडे दिले होते.तेव्हापासुन तेथील अपघातांचे प्रमाण खुपच कमी आले.(चुकीच्या नवसांमुळे तेथील दैवत उग्र बनले होते त्यामुळे तिथे वारंवार अपघात होत असत) अनेक काळ्या विद्यांपासुन तिथे कार्यकर्त्यांना संरक्षण मिळाले.
            असे अत्यंत महत्वाचे दत्तयंत्र आपल्याला विनामूल्य दर गुरुवारी श्री हरीगुरुग्राम येथे मस्तकास लावण्यास मिळते.पण आपण जात नाही म्हणजेच बापू द्यायला तयार आहे पण घ्यायला कुणी तयार नाही. 


२) सुखसावर्णि म्हणजे स्वेच्छासंकल्प.दर गुरुवारी त्रिविक्रमासमोर बसुन आपण नवस बोलू शकतो. आम्ही सद्गुरुंना दिलेले वचन म्हणजेच नवस. सद्गुरु नेहमी भक्तांसाठी partial असतात. बापू नेहमी सांगतात. मी संत नाही. संतांना सर्व समान असतात. मी(प.पू.बापू) सद्गुरु आहे कारण जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी मी  partiality  करतो. सद्गुरुंना केलेला नवस पुर्ण करताना चुकुन जरी काही राहिले तरी सद्गुरु कोपत नाही. इतर दैवतांकडे केलेला नवस व सद्गुरुंकडॆ केलेला नवस ह्यात हाच मोठा फरक आहे.
प्रत्येकाला जसा जमेल,झेपेल तसा तो नवस करु शकतो.फक्त नवस करताना कुठलीही गोष्ट पावित्र्य व वास्तवाला धरुन हवी.
"धरा दृढ बुद्धी माझ्या ठायी.." हा ultimate नवस आहे. 


३) बरेच भक्त स्वत:ला विनाकारण खुप तुच्छ लेखतात.हे चुकीचे आहे. स्वत:ला कमी लेखु नका.अहंकार नको पण आत्मसन्मान हवा. तसेच स्वत:कडुन चुका होऊ शकतात हे मान्य करायला हवे. कुटुंबियांच्या, श्रद्धावान मित्रांच्या चुकांचा उगीचच बाऊ करु नका.


४) दर गुरुवारी तसेच उपासना स्थळी सुचना पेटी ठेवलेली असते. ही पेटी फक्त दोष दाखवण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी पण आहे .संस्थेच्या उत्सवातील एखादी गोष्ट आवडली, एखादा गजर आवडला तरीही ह्या पेटीत आपण ते लिहुन देऊ शकतो.एखादी नवीन गोष्ट जिचा वापर संस्थेच्या कार्यामध्ये आपण करु शकतो अश्या गोष्टीविषयी देखील सुचना आपण ह्या पेटीत देऊ शकतो.

रामराज्य प्रवचनाआधी प.पू.बापूंनी ३५० च्या वर पुस्तके वाचुन काढली होती.बापुंच्या प्रत्येक कार्यामागे त्यांचा सखोल अभ्यास असतो. अश्याच अभ्यासाची अपेक्षा बापूंना भक्तांकडुन देखील आहे.


५) आयुष्यात सहज घडणार्या गोष्टींचे श्रेय सद्गुरुंना देता आले पाहिजे. सद्गुरुंशी कधीही खोटे बोलु नका. सद्गुरुंशी कायम कृतज्ञ रहा.

हरी ॐ